-
कमल हासन हे भारतीय सिनेसृष्टीतील एक अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखले जातात. १९६० साली कलाथूक कन्नमा या चित्रपटातून त्यांनी एक बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तेव्हा आजपर्यंत त्यांनी अनेक चकित करणाऱ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. या फोटो गॅलरीत आपण त्यांच्या गाजलेल्या १० व्यक्तिरेखा पाहणार आहोत.
-
इंद्रुदू चंद्रुडू – या चित्रपटात कमल हासन यांनी दोन भूमिका साकारल्या होत्या. पहिली व्यक्तिरेखा एका भष्टाचारी नेत्याची आहे तर दुसरी एका होतकरु तरुणाची.
-
चाची ४२० – १९९७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात कमल हासन यांनी एका लक्ष्मी नामक एक स्त्री पात्र साकारलं होतं. हा विनोदी चित्रपट त्यावेळी तुफान गाजला होता.
-
हे राम – या चित्रपटात त्यांनी एक म्हाताऱ्या माणसाची भूमिका साकारली होती. भारत-पाकिस्तानच्या फाळणीवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह यांनी महात्मा गांधींची व्यक्तिरेखा साकारली होती.
-
अभय – हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलरपट आहे. या चित्रपटात कमल हासन यांनी एका सीरिअल किलरची व्यक्तिरेखा साकारली होती.
-
अप्पू राजा – १९८९ साली प्रदर्शित झालेल्या Apoorva Sagodharargal या चित्रपटात कमल हासन यांनी अप्पू राजा ही व्यक्तिरेखा साकारली होती. ही एका बुटक्या (कमी उंचीच्या) व्यक्तीची भूमिका होती. हा विनोदी चित्रपट त्यावेळी तुफान गाजला होता.
-
दशावतारम – २००८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात कमल हासन यांनी १० वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या.
-
एक दूजे के लिए – १९८१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात कमाल हासन यांनी एका रोमँटिक हिरोची भूमिका साकारली होती. जबरदस्त गाणी, पटकथा आणि अफलातून अभिनय यामुळे हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता.
-
इंडियन – या चित्रपटात कमल हासन यांनी पिता आणि पुत्र या दोन्ही व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांच्या अफलातून अभिनयामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
-
पुष्पक – हा एक ब्लॅक कॉमेडी असलेला चित्रपट आहे. या चित्रपटातही त्यांनी अफलातून अभिनयाचं प्रदर्शन केलं होतं.
-
विश्वरूपम – हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कमल हासन यांनी दोन भिन्न प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. एक व्यक्तिरेखा नृत्य शिकवणाऱ्या शिक्षकाची आहे तर दुसरी रॉमध्ये काम करणाऱ्या गुप्तहेराची.

“जेवढं मिळतंय त्यात आनंद मानायला शिका”; आयुष्यात सतत तक्रार करणाऱ्यांनो चिमुकलीचा ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी