-
असे अनेक मराठी कलाकार आहेत ज्यांनी फिल्म किंवा टीव्ही इंडस्ट्रीबाहेरचा जोडीदार शोधला आहेत. यात काहींचं लव्ह मॅरेज आहे तर काहींचं अरेंज. असे कोणते मराठी कलाकार आहेत, जे पाहुयात..
क्रांती रेडकर – समीर वानखेडे अभिनेत्री क्रांती रेडकरचा पती समीर वानखेडे हा अंमलीपदार्थ विरोधी पथकात (एनसीबी) कार्यरत आहे. सोनाली कुलकर्णी- कुणाल बेनोडेकर मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या वाढदिवशी (१८ मे) साखरपुड्याची घोषणा केली. सोनालीचा होणारा पती कुणाल बेनोडेकर हा चार्टर्ड अकाऊंटंट असून दुबईत नोकरीला आहे. सई लोकुर- तीर्थदीप रॉय 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री सई लोकूर लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. तीर्थदीप रॉयशी सईचा साखरपुडा झाला असून मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरून या दोघांची ओळख झाली. येत्या ३० नोव्हेंबर रोजी हे दोघं लग्न करणार आहेत. तीर्थदीप हा आयटी कंपनीत नोकरी करतो. सई लोकुर- तीर्थदीप रॉय 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री सई लोकूर लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. तीर्थदीप रॉयशी सईचा साखरपुडा झाला असून मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरून या दोघांची ओळख झाली. येत्या ३० नोव्हेंबर रोजी हे दोघं लग्न करणार आहेत. तीर्थदीप हा आयटी कंपनीत नोकरी करतो. अभिज्ञा भावे – मेहुल पै 'खुलता कळी खुलेना' आणि 'तुला पाहते रे' यांसारख्या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री अभिज्ञा भावेनं नुकताच साखरपुडा केला. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा मालक मेहुल पै याच्याशी ती लग्नगाठ बांधणार आहे. अभिज्ञा आणि मेहुलचं हे दुसरं लग्न आहे.

ना मॉम, ना मम्मी…; परदेशात राहूनही जपले मराठी संस्कार! माधुरी दीक्षितची मुलं तिला ‘या’ नावाने मारतात हाक, पाहा फोटो