-
'आशिक बनाया आपने' या चित्रपटातून रातोरात स्टार झालेली अभिनेत्री तनुश्री दत्ता गेली १२ वर्ष सिनेसृष्टीपासून दूर आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
२००८ साली 'हॉर्न ओके प्लिज' या चित्रपटाच्या सेटवर तिने प्रसिद्ध अभेनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तेव्हापासून तनुश्री चित्रपटांमध्ये झळकलेली नाही. परंतु अखेर १२ वर्षांच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर चाहत्यांना तनुश्री चित्रपटात झळकताना दिसणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत असल्याची घोषणा केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"मी गेल्या काही वर्षांपासून चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांमुळे सिनेसृष्टीपासून दूर होते. परंतु आता मी माझा निर्णय बदलला आहे. आता पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय मी घेतला आहे." अशा आशयाची पोस्ट तनुश्रीने शेअर केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या पोस्ट सोबतच तिने स्वत:चा एक फोटो देखील शेअर केला आहे. गेल्या काही काळात सिनेसृष्टीपासून दूर असलेल्या तनुश्रीचे वजन बरेच वाढले होते. परंतु या फोटोमध्ये मात्र ती पहिल्यासारखी सडपातळ दिसत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
काही चाहत्यांच्या मते बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी तिनं स्वत:चं वजन कमी केलं. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तनुश्री गेली बारा वर्ष सातत्याने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करत आहे. हे प्रकरण कोर्टातही गेलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
नाना पाटेकर यांच्यामुळे माझं फिल्मी करिअर संपलं असाही आरोप तिने केला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिच्या या आरोपांमुळे काही निर्मात्यांनी नाना पाटेकर यांना देखील आपल्या चित्रपटांमधून काढून टाकलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा! थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा, जोडीदाराचं नाव आहे खूपच खास…