'माझ्या नवऱ्याची बायको', 'जय मल्हार' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे इशा केसकर. ( सौजन्य : इशा केसकर फेसबुक / इन्स्टाग्राम पेज) जय मल्हार या मालिकेमुळे प्रेक्षकांना इशा केसकर हे नाव माहित झाली आणि माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे ती प्रसिद्धी झोतात आली. त्याच इशाचा आज वाढदिवस. ११ नोव्हेंबर १९९१ मध्ये पुण्यातील एका मराठी कुटुंबात इशाचा जन्म झाला. -
इशाने पुण्यातील सिंहगड पब्लिक स्कुलमधून शालेय शिक्षण घेतलं असून महाविद्यालयीन शिक्षण सिम्बोयसिस महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. महाविद्यालयात असताना इशाने सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक यांच्यात भाग घेतला. २०१३ मध्ये ईशाने ‘वि आर ऑन, होऊन जाऊ द्या’ चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. ‘जय मल्हार’ मालिकेतील बानू या भूमिकेमुळे इशा घराघरात पोहोचली. या मालिकेतील तिची बानूची भूमिका चांगलीच गाजली होती. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत इशाने शनायाची भूमिका साकारली. मात्र, मालिका यशाच्या शिखरावर पोहोचत असतानाच इशाने ही मालिका मध्येच सोडली. सौंदर्य आणि अभिनयशैली यांच्या जोरावर आज इशाचे असंख्य चाहते असल्याचं दिसून येतं. करिअरप्रमाणेच इशाची लव्हलाइफदेखील चर्चेत असते. गेल्या तीन वर्षांपासून इशा ‘काहे दिया परदेस’ मालिकेतील अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करत आहे. इशा आणि ऋषीची पहिली भेट ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर झाली. इशा आणि ऋषी ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय कपल असल्याचं म्हटलं जातं. इशाने मराठी मालिकांप्रमाणेच काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केल्याचं सांगण्यात येतं. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'गर्लफ्रेंड' या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. 'याला जीवन ऐसे नाव','हॅलो!!! नंदन' या चित्रपटातही ती झळकली आहे.

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…