दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा 'नगीना' हा चित्रपट साऱ्यांनाच ठावूक असेल. या चित्रपटात श्रीदेवी यांनी इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट त्याकाळी तुफान गाजला होता. त्यानंतर आता अभिनेत्री श्रद्धा कपूर ही भूमिका साकारण्यास सज्ज झाली आहे. ( सौजन्य : श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम पेज) अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच नागिणीच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. आगामी चित्रपटात ती नागिणीची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्रामवर नागिणच्या लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. श्रद्धाने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांनी खास तयार केल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा नागिणीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता श्रद्धाने नव्या लूकमधील फोटो शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. "अत्यंत सुंदर आर्टवर्क आणि एडिट्समधील हा फोटो शेअर करत आहे", असं म्हणत श्रद्धाने हा फोटो शेअर केला आहे. दरम्यान,श्रद्धाच्या या आगामी चित्रपटाचं नाव अद्याप जाहीर झालेलं नाही. मात्र, दिग्दर्शक विशाल फुरिया या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. हा आगामी प्रोजेक्ट तीन चित्रपटांची सीरिज असेल. निखिल द्विवेदी त्याचे निर्माते असतील. श्रद्धाने याआधी ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात भूमिका साकारली होती. त्यानंतर आता ती एका इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारणार आहे. -
नागिण लूकमधील श्रद्धाचा फोटो
-
श्रद्धाने शेअर केलेला खास फोटो

HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत