-
सध्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या 'आश्रम-२' वेबसीरिजची बरीच चर्चा आहे. पहिल्या सीझनप्रमाणे दुसऱ्या सीझनबद्दलही प्रेक्षकांना बरीच उत्सुक्ता आहे. (सर्व फोटो सौजन्य – त्रिधा चौधरी इन्स्टाग्राम)
-
बॉबी देओलने या वेबसीरीजमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत अनुप्रिया गोएंका, दर्शन कुमार, आदिती पोहनकर आणि त्रिधा चौधरी असे कलाकार आहेत.
-
लोकांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या 'काशीपूर वाले बाबा निराला' म्हणजे बॉबी देओल बरोबर काय होणार? ते दुसऱ्या सीझनमध्ये समजणार आहे.
-
दुसऱ्या सीझनमध्ये बॉबी देओल आणि त्रिधा चौधरीच्या हॉट सीनचीही बरीच चर्चा आहे. पहिल्या सीझनच्या अखेरच्या भागात बॉबी त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवणाऱ्या समर्थकांचा कसा विश्वास घात करतो, ते दाखवण्यात आले होते.
-
पहिल्या सीझनच्या अखेरच्या एपिसोडमध्ये त्रिधा चौधरी म्हणजे बबिता आणि बॉबी देओलवर हॉट सीन चित्रित झाले होते. आता दुसऱ्या भागात त्यांच्यातील नाते कसे आकाराला येते, ते दाखवण्यात येणार आहे.
-
पहिल्या सीझनच्या तुलनेत दुसऱ्या सीझनमध्ये त्रिधा चौधरीच्या भूमिकेला जास्त वाव आहे. कारण पहिल्या भागात तिला नवऱ्याची आपल्या संसाराची चिंता होती. आता दुसऱ्या सीझनमध्ये तिच्या इच्छा, महत्वकांक्षांमध्ये बदल झालेला असेल.
-
या वेबसीरीजमध्ये त्रिधा चौधरीची भूमिका विशेष लक्षात राहते. तिच्या वाटयाला जो रोल आला आहे, त्यात त्रिधा छाप उमटवण्यात यशस्वी ठरते.
-
त्रिधा चौधरी हा बंगाली, तेलगु सिनेसृष्टीतील एक नावाजलेला चेहरा आहे. २०१३ साली त्रिधाने बंगाली फिल्ममधून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
-
आश्रमच्या पहिल्या सीझनमध्ये त्रिधा एका गृहिणीच्या भूमिकेत आहे. पण दुसऱ्या सीझनमध्ये तिच्या रोलच्या वेगळया छटा आपल्याला पाहायला मिळतील. 'आश्रम'मध्ये सामूहिक विवाहसोहळयापासून तिची भूमिका सुरु होते. सामूहिक विवाहसोहळया तिचा विवाह होतो. त्रिधाच्या नवऱ्याचा आणि त्याच्या बहिणीचा या बाबावर प्रचंड विश्वास असतो. त्रिधाला हे फार पटत नसतं. पण संसारासाठी ती या सगळयाशी जुळवून घेते.
-
एक दिवस आश्रमात कार्यक्रम सुरु असताना 'काशीपूर वाले बाबा निराला' म्हणजे बॉबी देओलच्या ती नजरेत येते. त्यानंतर तिच्या सुखी संसाराला नजर लागते.

HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत