-
‘चक दे इंडिया’ फेम अभिनेत्री सागरिका घाटगे ही सतत चर्चेत असते. तिने भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज झहीर खानशी लग्न केले आहे. ते लग्नानंतर मुंबईमध्ये राहतात. त्यांचे आलिशान घर तुम्ही पाहिले आहे का? चला पाहूया…
-
सागरिकाने घरातील प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.
-
तिने संपूर्ण घरात पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
हॉलमध्ये त्यांनी क्रिम कलरचे सोफे ठेवले आहेत.
-
सागरिकाने घरात अनेक पेंटींग लावले आहेत.
-
ती सतत सोशल मीडियावर घरातील फोटो शेअर करत असते.
-
झहीर खानने देखील लॉकडाउनच्या काळात सागरिकासोबत वेळ घालवतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
सागरिकाने तिचा वाढदिवस साजरा करतानाचे काही फोटो शेअर केले होते.
-
करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सागरिकाने कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा केला होता.
-
करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सागरिकाने कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा केला होता.
-
झहीर हा अतिशय शांत आहे आणि त्याच्या अगदी उलट सागरीका असल्याचे म्हटले जाते.
-
सागरिका आणि झहीरची ओळख अंगद बेदी आणि इतर काही मित्रांमुळे झाली.
-
दोघांनी जवळपास दीड वर्ष एकमेकांना डेट केले.
-
मात्र, या दोघांनीही कोणालाच त्यांच्या प्रेमप्रकरणाची कानोकान खबर लागू दिली नाही.
-
पहिल्या भेटीत हे दोघंही एकमेकांना पसंत करू लागले असल्याचे म्हटले जाते.
-
दोघांच्या नंतर भेटीगाठी वाढल्या आणि अनेक कार्यक्रमांमध्येही ते एकत्र दिसू लागले. इतकेच नव्हे तर आयपीएल सामन्यांवेळीही सागरिका त्याला पाठिंबा देताना दिसली.
-
युवराज सिंगच्या गोव्यात झालेल्या लग्नापासून जयपूरमधील रिसेप्शनमध्येही सागरिका-झहीर एकत्र दिसले.
-
-
शाहरुखसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सागरिकाने ‘फॉक्स’, ‘मिले ना मिले हम’, ‘रश’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
याव्यतिरीक्त तिने अतुल कुलकर्णीसोबत ‘प्रेमाची गोष्ट’ या मराठी चित्रपटातही काम केले आहे.

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली