रंग उजळवण्यासाठी, चेहरा खुलवण्यासाठी, नाक किंवा ओठ आणखी रेखीव करण्यासाठी अनेक कलाकार प्लास्टिक सर्जरीचा पर्याय निवडतात. अनुष्का शर्मा पासून प्रियांका चोप्रापर्यंत अशा कोणत्या अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरी केली ते पाहुयात.. -
'रब ने बदा दी जोडी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनुष्का शर्माने ओठांची सर्जरी केली.
-
अभिनेत्री श्रुती हासनने नाक व ओठांची सर्जरी केली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर याची कबुली दिली.
-
'देसी गर्ल' प्रियांकाने ओठांची सर्जरी केली आहे. तिचा सर्जरीपूर्वीचा लूक 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटात पाहायला मिळतो.
-
वाणी कपूरने ओठांची सर्जरी केली असून तिने याबाबत खुलासा कधीच केला नाही.
-
शिल्पा शेट्टीने नाक आणि ब्रेस्ट एनलार्जमेंट सर्जरी केली आहे.
-
बिपाशा बासूने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच ब्रेस्ट एनलार्जमेंट सर्जरी केली होती.
-
आयशा टाकियाने ओठांची सर्जरी केली असून त्यासाठी तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
-
कोईना मित्राने २०११ मध्ये नाकाची सर्जरी केली होती. मात्र त्यानंतर तिच्या आरोग्यावर त्याचे खूप वाईट परिणाम झाले. नंतर जेव्हा ती 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये आली, तेव्हा तिने प्लास्टिक सर्जरी करणं ही सर्वांत मोठी चूक असल्याचं कबूल केलं.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली