-
'सिंघम'फेम प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल विवाहबंधनात अडकली सध्या पतीनसोबत हनिमून साजरा करत आहे. (All Photos: Kajal Instagram)
-
काजल हनिमूनसाठी मालदीवमध्ये पोहोचली आहे.
-
काजलने ३० ऑक्टोबरला उद्योगपती गौतम किचलूसोबत लग्न केलं.
-
गौतम Discern Living या होम इंटिरियअर डिझाईन कंपनीचा मालक आहे.
-
मालदीवमध्ये पोहोचल्यापासून काजल सतत तेथील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
-
फोटोंमधून काजल आणि पती गौतम मालदीवमध्ये क्वालिटी वेळ घालवत असल्याचं दिसत आहे.
-
काजोलचे हे फोटो तिच्या चाहत्यांनाही फार आवडत आहेत.
-
मालदीवमध्ये राहण्यासाठी काजल आणि पती गौतमने The Muraka या रिसॉर्टची निवड केली आहे.
-
हे रिसॉर्ट अंडरवॉटर असून काजोलने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
Conrad Maldives Rangali Island वर रिसॉर्ट आहे.
-
काजोलने शेअर केलेल्या फोटोंमध्ये समुद्राचं निळंशार पाणी आणि मासे दिसत आहे.
-
मी मासे पाहत आहे की ते मला पाहत आहेत अशी कॅप्शन काजोलने फोटो शेअर करताना दिली आहे.
-
काजलचे हे फोटो पाहून अनेकांनी या ठिकाणी जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
-
काजल आणि गौतमचा जून महिन्यात साखरपुडा झाला होता.
-
लग्नाच्या काही दिवसांआधीच काजोनले आपण विवाहबंधनात अडकत असल्याची घोषणा केली होती.
-
काजोल आणि गौतमने अगदी धुमधडाक्यात लग्न केलं. यावेळी मेहंदी, हळदी तसंच पूजा असे सर्व कार्यक्रम करण्यात आले.
-
काजल अग्रवाल व गौतम किचलू यांचा विवाह पंजाबी आणि काश्मिरी पद्धतीनं पार पडला.
-
हा लग्न सोहळा खासगी ठेवण्यात आला होता. मोजक्याच लोकांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडला होता.
-
मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांचा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
-
काजोल आणि गौतम लग्नानंतर नव्या घऱात शिफ्ट होणार असून त्याची तयारी करत आहेत.
-
दुसरीकडे काजोलच्या हातात अनेक चित्रपट आहेत. मुंबई सागा, आचार्य, पॅरिस पॅरिस, इंडियन २ अशा अनेक चित्रपटांमध्ये काजोल झळकरणार आहे.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली