आनंदाचा, उत्साहाचा आणि सर्वांसोबत मिळून साजरा करण्याचा दिवाळी हा सण. दिवाळीनिमित्त सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत जोरदार तयारी सुरु असते. अभिनेत्री अंकिता लोखंडेने यंदा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत दिवाळी साजरी करत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अंकिताने इन्स्टाग्रामवर या सेलिब्रेशनचे बरेच फोटो पोस्ट केले आहेत. लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये अंकिताचं सौंदर्य खुलून दिसत आहे. 'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे अंकिता लोखंडे घराघरात पोहोचली. या मालिकेदरम्यान तिच्या आणि सुशांत सिंह राजपूतच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगल्या होत्या. अंकिता सुशांतसोबत सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. सुशांतसोबत ब्रेकअपच्या काही काळानंतर अंकिताच्या आयुष्यात विकी जैन आला. विविध कार्यक्रमांमध्ये या दोघांना एकत्र पाहिलं गेलं असून काही दिवसांपूर्वीच विकीने अंकितान प्रपोज केलं. प्रपोज करतानाचे फोटोसुद्धा अंकिताने सोशल मीडियावर शेअर केले होते. विकी जैन मुंबईतील एक व्यावसायिक आणि बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा सहमालक आहे. -
अंकिताने ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने झलकारी बाईची व्यक्तिरेखा साकारली होती.
-
च्या वाट्याला आलेली लहानशीच भूमिका तिने उत्तमरित्या साकारली होती.
-
'बागी ३'मध्ये अंकिताने टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरसोबत काम केलं.
-
या चित्रपटात तिने रितेश देशमुखच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
-
सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, अंकिता लोखंडे

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग