-
घड्याळ्यांचं कलेक्शन करायला अनेक लोकांना आवडतं आणि त्यातूनच ब्रँडेड घड्याळ असतील तर गोष्टच वेगळी.
खेळाडूंपासून ते कलाकारांपर्यंत.. अनेकजण ब्रँडेड घड्याळ वापरतात. कलाकारांमध्ये बघायला गेलं तर दक्षिणात्य सुपरस्टार बाहुबली म्हणजेच प्रभासलादेखील घड्याळ्यांचं प्रचंड वेड आहे. प्रभासचं घड्याळ्यांचं कलेक्शन पाहून तर सगळे चकित होतात. प्रभास जवळ Hublot Sang Bleu II All Black घड्याळ असून याची किंमत जवळपास १२ ते १५ लाख रूपयांपर्यंत आहे. प्रभासकडे HUBLOT ची दुसरी Big Bang Sang Bleu All White घड्याळ आहे आणि या घड्याळ्याची किंमत सुमारे १३ लाख रूपये आहे. प्रभासकडे Bell and Ross BR03-92 ही घड्याळ असून हिची किंमत ३ लाख ७५ हजारांच्या जवळपास आहे. प्रभासकडे Louis Vuitton Tambour Regatta Navy हे ३ लाख ७० हजार रुपयांचं घड्याळ आहे. प्रभासला रॉलेक्स घड्याळ्यांचंही वेड आहे. प्रभासकडे २७ लाख रुपयांची Rolex Cosmograph Daytona 18CT Gold Case चं घड्याळ आहे. Rolex Yacht-Master II हे जवळपास २८ लाख रुपयांहून अधिक किंमत असलेलं घड्याळ प्रभासकडे आहे.

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक