-
सलमान खानची छोटी बहिण अर्पिता खानच्या लग्नाचा आज सहावा वाढदिवस आहे. १८ नोव्हेंबर २०१४ रोजी आयुष शर्मा सोबत अर्पिता विवाह बंधनात अडकली. अर्पिताचा लग्न सोहळा सलमान खानच्या बरोबरीने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसाठी सुद्धा खास आहे. (सर्व फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
कारण अर्पिताच्या लग्नाच्या निमित्ताने शाहरुख-सलमानमधील अनेक वर्षांपासून सुरु असलेले भांडण संपुष्टात आले. दोघांमध्ये पुन्हा एकदा मैत्रीचा धागा जुळला. कतरिना कैफच्या बर्थ डे पार्टीत शाहरुख आणि सलमानमध्ये मोठे भांडण झाले होते.
-
अर्पिताच्या लग्नाआधी बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीमध्ये शाहरुख आणि सलमानने परस्परांची गळाभेट सुद्धा घेतली होती. पण भांडण खऱ्या अर्थान संपुष्टात आले ते अर्पिताच्या लग्नामध्ये.
-
हैदराबादच्या ताज फलकनुमा पॅलेसमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडला. लग्नाच्या आधी झालेल्या कार्यक्रमाला शाहरुखने हजेरी लावली होती.
-
"मी अर्पिताच्या लग्न सोहळयाला नक्की जाणार. मी तिला लहानपणापासून ओळखतो. ती मला बहिणीसारखी आहे. मला निमंत्रणाचीही गरज नाही. ते मला कुटुंबासारखे आहेत. मी जाणार" असे शाहरुख पत्रकारांना म्हणाला होता.
-
शाहरुख लग्नाला उपस्थित राहू शकला नाही पण तो मुंबईत झालेल्या अर्पिताच्या लग्नाच्या संगीत सोहळयाला उपस्थित होता. शाहरुखने या कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत केले तसेच घरच्या सदस्यासारखा त्याने या कार्यक्रमात डान्स केला होता.
-
अर्पिताच्या लग्नानंतर महिन्याभराने सलमानसोबत झालेल्या पॅचअपवर शाहरुख बोलला होता.
-
"मी आणि सलमानने आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण अनुभवले आहेत. काही दु:खाचे क्षणसुद्धा पाहिले आहेत. मला एका गोष्टीची खात्री आहे की आयुष्यात आनंदाचे आणि दु:खाचे क्षण वाटून घेण्यासाठी आम्ही सोबत असू"
-
"२५ वर्षांपूर्वी आमच्यामध्ये जसे संबंध होते, तसेच आजही आहेत. आमच्या मनात परस्पराबद्दल कुठलाही राग नाही. आम्ही पठाण गरम डोक्याचे आहोत. काही वेळा वाद होतात पण त्यापेक्षा जास्त काही नाही. अर्पिताला मी माझ्या डोळयासमोर लहानाचा मोठे होताना पाहिले आहे. आमच्या बहिणीचे लग्न होतेय, ही आनंदाची बाब असून आम्हाला तिथे असले पाहिजे" असे शाहरुख खान म्हणाला होता.
-
कतरिनाच्या बर्थ डे पार्टीत सलमान आणि शाहरुख खान झालेले भांडण त्यावेळी बरेच गाजले होते.

Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना बुलेटप्रूफ वाहनही नाकारले, ६ महिने साध्या इनोव्हातून प्रवास; राजीनाम्याआधी काय घडलं?