'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आशा नेही हीने नुकतंच चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 'ल्युडो' या चित्रपटात तिने अभिषेक बच्चनसोबत भूमिका साकारली. एकीकडे तिच्या या चित्रपटाची चर्चा असतानाच दुसरीकडे सोशल मीडियावर तिच्या एका फोटोचीही तुफान चर्चा आहे. आशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टॉपलेस फोटो पोस्ट केला आहे. 'मी हा फोटो कदाचित नंतर डिलिट करेन', असं कॅप्शन तिने या फोटोला दिलंय. आशाने हा कृष्णधवल फोटो आरशात पाहून काढला आहे. तिनं एका चादरीत स्वत:ला लपेटून घेतल्यात या फोटोत पाहायला मिळत आहे. याआधी आशाला बोल्ड अंदाजात पाहिलं गेलं नव्हतं. म्हणून तिच्या या फोटोची सध्या जोरदार चर्चा आहे. काही चाहत्यांनी तिला हा फोटो डिलिट न करण्याची विनंती केली आहे. 'ल्युडो'मधील आशाच्या अभिनयाचं कौतुक अभिषेकनेही केलं. "टेलिव्हिजनमधून चित्रपटांपर्यंतचा प्रवास सोपा नसतो. आशाच्या अभिनयाने मीसुद्धा प्रभावित झालो", असं त्याने एका मुलाखतीत म्हटलं. सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, आशा नेगी

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक