अभिनेत्री अनुष्का शर्माने गरोदरपणात शीर्षासन करतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली. गरोदरपणात अशा अनेक अभिनेत्रींनी योगासनं करण्यावर भर दिला आहे. अनुष्का शर्माने हा फोटो पोस्ट करत लिहिलं, 'गरोदर असण्यापूर्वी मी जी काही योगासनं करत होती, ती सर्व आता गरोदर असतानाही करू शकते असं माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं. एका विशिष्ट टप्प्यानंतर खूप पुढेपर्यंत वाकण्याचे व्यायाम आणि ट्विस्ट्स वगळता आवश्यक आधारसह मी योगासनं करू शकते. शीर्षासन मी गेल्या अनेक वर्षांपासून करतेय. भिंतीच्या आधारे मी हे करू शकले आणि सुरक्षेच्या खातर माझ्या पतीने मला आधार दिला. हे सुद्धा माझ्या योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करू शकले, जे पूर्ण वेळ माझ्यासोबत ऑनलाइन जोडले गेले होते.' -
करीना कपूरनेही नेहमीच योगासनांवर भर दिला.
गरोदरपणात दररोज एक तास योगासन करत असल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं. मन आणि शरीराला प्रसन्न व ताजंतवानं ठेवण्यासाठी अभिनेत्री अॅमी जॅक्सननेही गरोदरपणात योगासनांचा सराव केला. -
निरोगी आणि फिट लाइफस्टाइलसाठी लिसा हेडननेही योगासनांचा आधार घेतला.
-
लिसाने काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
अभिनेत्री समीरा रेड्डीने योगासनांचे फायदे सोशल मीडियाद्वारे इतरांनाही सांगितले. बाळंतपणासाठी स्वत:ला तयार करण्यात योगासनांचा मोलाचा वाटा असतो, असं म्हणत सोहा अली खानने फोटो पोस्ट केले होते. -
छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, सोहा अली खान
लारा दत्ताने योगासनांचे व्हिडीओ युट्यूबवर पोस्ट केले. याचसोबत तिने डीव्हीडीसुद्धा रेकॉर्ड केले.

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…