बिग बॉस या लोकप्रिय शोमधून चर्चेत आलेला सेलिब्रिटी म्हणजे राहुल महाजन. बऱ्याचदा प्रोफेशनल लाइफपेक्षा राहुल त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आला. (सौजन्य : राहुल महाजन /नताल्या महाजन इन्स्टाग्राम पेज.) सध्या राहुल त्याच्या तिसऱ्या पत्नीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राहुलने तिसरं लग्न केलं असून त्याची पत्नी रशियन असल्याचं सांगण्यात येते. राहुलच्या पत्नीचं नाव नताल्या असून तिने खास राहुलसाठी धर्मपरिवर्तन केल्याचं म्हटलं जात आहे. नताल्या राहुलपेक्षा १८ वर्षांनी लहान आहे. राहुलचं वय ४५ असून नताल्या २७ वर्षांची आहे. नताल्या आणि राहुलने २०१८ मध्ये अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं. नताल्या सोशल मीडियावर सक्रीय असून तिने पारंपरिक भारतीय पेहरावातील फोटो शेअर केले आहेत. -
नताल्याने शेअर केलेला बोल्ड फोटो
-
नताल्याच्या सौंदर्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
-
नताल्याने शेअर केलेला खास साडीतील फोटो
-
एक जुनी आठवण म्हणून नताल्याने हा फोटो शेअर केला आहे.
-
-
नताल्याने इन्स्टाग्रामवर तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
-
साडीमध्ये खुललं नताल्याचं सौंदर्य.
नताल्यापूर्वी राहुलने श्वेता सिंहसोबत पहिलं लग्न केलं होतं. मात्र, हे लग्न फार काळ टिकलं नाही. त्यानंतर त्याने ‘राहुल दुल्हनिया ले जायेंगे’ या रिअॅलिटी शोमधून वधूपरीक्षा घेत दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला. या शोची विजेती डिम्पी गांगुलीसोबत त्याने दुसरं लग्न केलं.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग