-
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री व्हीजे चित्रा कामराज हिने गळफास लावून आत्महत्या केली. ती केवळ २८ वर्षांची होती. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. अद्याप तिच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
चित्रा कामराजच्या आत्महत्येमुळे तिचा चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. या फोटो गॅलरीत आपण चित्राच्या अभिनय कारकिर्दीवर नजर मारणार आहोत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
चित्रा दाक्षिणात्य टीव्ही दुनियेतील एक लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने २०१३ साली Sattam Solvathu Enna? या रिअॅलिटी शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या शोमध्ये ती निवेदकाच्या भूमिकेत झळकली होती. त्यानंतर Nodiku Nodi Athiradi, Oor Suthalaam Vaanga, Vilayadu Vaagai Soodu, Ossthi Comedy Kusthi यांसारख्या अनेक शोमध्ये तिने निवेदकाचं काम केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अफाट सौंदर्य, हजरजबाबीपणा आणि मनमोहक बोलणं यामुळे अल्पावधीतच ती लोकप्रिय झाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर तिला Mannan Magal या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेत तिने सोज्वळ सुनेची भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर Velunachi, Pandiyan Stores, Raja Rani, Saravanan Meenatchi यांसारख्या अनेक मालिकांमध्ये ती झळकली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
चित्रा कामराज एक उत्तम डान्सर देखील होती. तिने क्लासिकल डान्सचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. काही वर्षांपूर्वी सुर्या टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तिला डान्सर व्हायचं होतं अशी इच्छा तिने व्यक्त केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु कॉलेजमध्ये असताना तिने एका रेडिओ वाहिनीवर रेडिओ जॉकीचं काम केलं अन् तिच्यामध्ये अभिनयाची आवड निर्माण झाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनयात ती कार्यरत होती तरी देखील तिनं डान्स करणं सोडलं नाही. अभिनेत्री म्हणून यशाच्या शिखरावर असतानाही तिनं झी डान्स लीगमध्ये एक स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
गेल्या वर्षी Vasool Vettai या शोमध्ये तिने अँकर म्हणून काम केलं होतं. हा दुदैवानं हा तिच्या करिअरचा शेवटचा शो ठरला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
चेन्नईतील नसरपेट येथील हॉटेलमध्ये चित्राने गळफास घेतला. नैराश्य आल्यामुळे चित्राने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
चित्राचा अलिकडेच प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत रवीसोबत साखरपुडा झाला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"शुटींग संपल्यावर चित्रा हॉटेलमध्ये आली आणि आंघोळीला जाते सांगून बाथरुममध्ये गेली. बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही, त्यामुळे मी दार वाजवलं. पण आतून कोणताही आवाज आला नाही." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"त्यानंतर मी हॉटेल स्टाफला सांगून डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला त्यावेळी चित्राचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला", अशी माहिती हेमंतने पोलिसांना दिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

२८ जुलैपासून ‘या’ ४ राशींचा वाईट काळ सुरू! कामांमध्ये वारंवार अपयश तर आर्थिक नुकसान, तब्येतही बिघडू शकते…