लॉकडाउनच्या काळात चित्रपटसृष्टी ठप्प झाली असताना प्रेक्षकांचा ओढा ओटीटी माध्यमांकडे वाढला. याच काळात बरेच वेब सीरिज प्रेक्षकांकडून पाहिले गेले आणि त्यांना पसंतीसुद्धा मिळाली. २०२० मध्ये IMDb गाजवणाऱ्या १० सर्वोत्तम वेब सीरीज कोणत्या आहेत, ज्यांना प्रेक्षकांनी पसंती दिली, ते पाहुयात… सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली 'स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी' ही वेब सीरिज पहिल्या स्थानावर आहे. प्रेक्षकांनी या सीरिजला सर्वाधिक रेटिंग दिले आहेत. -
अॅमेझॉन प्राइमवरील पंचायत ही सीरिज दुसऱ्या स्थानावर आहे.
-
स्पेशल ओपीएस (Special Ops) कुठे पाहता येणार : Disney Plus Hotstar या सीरिजमध्ये के के मेनन, करण ठक्कर, सैय्यामी खेर, दिव्या दत्ता, विनय पाठक, मुझम्मिल इब्राहिम, मेहेर विज, विपुल गुप्ता यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. संसदेवरील हल्ला, २६/११ हल्ल्या, काश्मीरमधील दहशतवाद हल्ला अशा विविध घटनांवर ही सीरिज भाष्य करते. नीरज पांडेने या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. ही सीरिज चौथ्या स्थानावर आहे.
वेबसीरिजच्या ठरावीक, मसालेबाज, थरार कथानकांपासून अलग आणि संगीतमय अशी ही वेबसीरिज एक उत्तम दृश्यानुभव आहे. या सीरिजने चौथं स्थान पटकावलंय -
पाचव्या स्थानी असलेली मिर्झापूर ही वेब सीरिज गुन्हेगारी जगत, सत्ता, संघर्ष, खून आणि धमाकेदार अॅक्शन या सगळ्यावर आधारित आहे. या वेब सीरिजमध्ये दोन भावांची कथा असून उत्तर प्रदेश आणि बिहारची रंगबाजी आणि गँगवॉर बघायला मिळतं.
-
ओनी सेन दिग्दर्शित ही वेब सीरिज सहाव्या स्थानी आहे. या वेबसीरिजचे आठ भाग आहेत.
-
अनुष्का शर्मा निर्मित पाताल लोक ही वेब सीरिज सातव्या स्थानावर आहे.
-
अमली पदार्थांशी निगडीत कथानक असलेली 'हाय' ही वेब सीरिज आठव्या स्थानी आहे.
-
कुणाल खेमूची प्रमुख भूमिका असलेली अभय ही सीरिज नवव्या स्थानी आहे.
-
जवळपास दीड दशकांनंतर अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणारी सुष्मिता सेन या वेब सीरिजच्या शीर्षक भूमिकेत आहे. टॉप १० मध्ये दहाव्या स्थानावर ही सीरिज आहे.

देशात फक्त ‘या’ एकाच स्थानकावरून सर्वदिशांना ट्रेन पकडता येते; ठिकाणाचे नाव ऐकून थक्क व्हाल