-
बॉलिवूड सेलिब्रिटी हे कायमच चर्चेत असतात. त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. या कलाकरांच्या खासगी आयुष्याविषयी फार कमी लोकांना माहिती असते. आज आपण अशा काही बॉलिवूड सेलिब्रिटींविषयी जाणून घेणार आहोत ज्यांच्या मुलांचे निधन झाले आहे…
-
आशा भोसले यांनी दोन वेळा लग्न केले आहे. त्यांना पहिल्या पतीपासून तिन मुले. सर्वात मोठ्या मुलाचे नाव हेमंत होते आणि मुलीचे नवा वर्षा. वर्षाने स्पोर्ट्स रायडर हेमंत केंकरेशी लग्न केले होते. पण १९९८मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर वर्षा आईसोबत मुंबईमध्ये राहू लागली.
-
ऑक्टोबर २०१२मध्ये वर्षाने आत्महत्या केली. त्यानंतर २०१५मध्ये मुलगा हेमंतचे कर्करोगाने निधन झाल्याचे म्हटले जाते.
-
लोकप्रिय गायक जगजीत सिंह आज आपल्यामध्ये नाहीत. त्यांना एकच मुलगा होता. १९९० साली एका अपघातामध्ये त्यांच्या मुलाचे निधन झाले.
-
अभिनेता शेखर सुमन यांच्या मोठ्या मुलाचे 'देख भाई देख' या मालिकेच्या चित्रीकरणावेळी निधन झाले होते.
-
‘देख भाई देख ही मालिका माझ्या हृदयाच्या जवळ आहे. कारण या मालिकेचे चित्रीकरण सुरु असताना माझा मोठा मुलगा आयुष आजारी झाला आणि आजारपणात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मला मालिकेत काम करण्याची इच्छा नव्हती. पण मी म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे पैसे फार कमी होते आणि हॉस्पिटलची बिले इतकी जास्त होती की माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता’ असे शेखर यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते.
-
अभिनेते कबीर बेदी यांच्या मुलाने वयच्या २६व्या वर्षी आत्महत्या केली होती.
-
कबीर यांचा मुलगा सिद्धार्थ नैराश्यामध्ये होता असे म्हटले जाते.
-
कॉमेडियन राजीव निगम यांचा मुलगा देवराजचे ८ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झाले. राजीव यांच्या वाढदिवशीच त्यांच्या मुलाचे निधन झाल्याचे त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले.
-
प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. वयाच्या ३५व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला.

Video: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत विधिमंडळातच फ्री स्टाईल हाणामारी; आव्हाड यांनी केला गंभीर आरोप