-
छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि दीर्घकाळ चाललेली मालिका म्हणजे ‘सीआयडी.’ या मालिकेने लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत अनेकांची मने जिकंली होती. मालिकेतील एसीपी प्रद्युमन, इन्स्पेक्टर अभिजीत, दया, फ्रेड्री, डॉ. साळुंखे आणि डॉ. तारिका ही पात्रे घराघरात पोहोचली होती. २०१८मध्ये मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण मालिकेतील ‘दया दरवाजा तोडदे’ हा डायलॉग आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असल्याचे दिसत आहे. पण हा डायलॉग म्हणणारा दया सध्या काय करतो असा प्रश्न अनेकांना पडला असले. चला जाणून घेऊया त्याच्या विषयी..
-
बॉलिवूड अभिनेता दया शेट्टीचा आज ११ डिसेंबर रोजी ५१ वा वाढदिवस आहे.
-
दयाचे खरे नाव दयानंद शेट्टी आहे.
-
दयाने दिलजले, जॉनी गद्दार, रनवे आणि सिंघम रिटर्न्स या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
दयाला खरी ओळख छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'CID'ने मिळवून दिली.
-
१९९८ साली दयाने पहिल्या मालिकेत काम केले होते. त्याने २००५ पर्यंत या मालिकेत काम केले होते.
-
CID मालिकेती 'दया दरवाजा तोड दो' हा डायलॉग भलताच गाजला होता.
-
आजही 'दया दरवाजा तोड दो हा डायलॉग अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतो.
-
एका मुलाखतीमध्ये दयाला आजवर किती दरवाजे तोडले आहेत असे विचारण्यात आले होते. त्यावर त्याने 'याचा मी कोणता रोकॉर्ड ठेवलेला नाही. पण इतकं नक्की याचा गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड झाला असता. मी १९९८ पासून दरवाजा तोडत आहे. जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा एका भागात गेट बंद असल्यामुळे दरवाजा तोडण्यास मला सांगण्यात आले होते. पण ही गोष्ट प्रेक्षकांना जास्त आवडली' असे दया म्हणाला होता.
-
पुढे तो म्हणाला, 'माझं बघून अनेकांनी दरवाजा तोडायला सुरुवात केली. फ्रेडीने पण दरवाजा तोडला होता. पण लोकांना दयाने दरवाजा तोडणे सर्वात जास्त आवडले’ असे दयाने सांगितले. लोकांना मी दरवाजा तोडतानाचा सीन आवडू लागला. त्यानंतर आम्ही ते चालवू लागलो. तो एक ट्रेडमार्क बनला आणि दरवाजे तूटत गेले.'
-
आता दया लवकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
MX प्लेअप या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक क्राइम थ्रिलर वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.
-
दया या वेब सीरिजमध्ये काम करताना दिसणार असल्याचे म्हटले जाते. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (All Photos: Instagram)

“आता काय जीवच घेणार का?” महिलेला अंड्यात सापडलं पाहा; VIDEO पाहून यापुढे अंडी खाताना शंभर वेळा विचार कराल