-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय निर्माती म्हणून एकता कपूरकडे पाहिले जाते. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एकताचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये ती एका मुलासोबत दिसत होती. त्यामुळे हा मुलगा नक्की कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. या मुलाचे नाव तणवीर बूकवाला आहे. एकता आणि तरणवीर लग्न करणार असल्याच्या चर्चा आहे. चला जाणून घेऊया कोण आहे तनवीर बूकवाला…
-
तनवीर बूकवाला एका कंपनीचा संस्थापक आणि क्रिएटिव्ह डिरेक्टर आहे.
-
तनवीरने एकताच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम केले आहे.
-
क्रिस्टल डिसूझा, अनुष्का रंजन, आदित्य सील यांच्या 'Fittrat' या वेब शोसाठी एकताने तनवीरसोबत काम केले.
-
तनवीरने २००५मध्ये बालाजी टेलिफिल्मसोबत काम करत करिअरला सुरुवात केली.
-
त्यानंतर त्याने 'क्या कहानी' या शोमध्ये सहाय्यक क्रिएटिव्ह हेड म्हणून काम केले.
-
नंतर त्याने एका टीव्ही शोचे दिग्दर्शन केले.
-
२००९ मध्ये तनवीरने एन्डमोल इंडियाबरोबर काम करण्यास सुरवात केली आणि तीन वर्षांनंतर तो पुन्हा बालाजी मोशन पिक्चर्समध्ये काम करु लागला.
-
त्यानंतर त्याने 'क्या सुपर कूल हैं हम', 'कुकू माथुर की झंड हो गयी,' आणि 'एक विलन' यासारख्या कित्येक चित्रपटांमध्ये क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून काम केले आहे.
-
२०१४ मध्ये, त्याने सुहानी कंवर यांच्यासोबत 'रागिनी एमएमएस २' चित्रपटाचा को-रायटर म्हणून काम केल.
-
क्या कूल हैं हम ३ आणि अझर या चित्रपटासाठी निर्माता म्हणूनही त्याने काम केले आहे.
-
२०१७ मधील केन घोष दिग्दर्शित 'एक्सएक्सएक्स' या वेबसिरीजचे लेखन तनवीरने केले आहे.

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक