बॉलिवूडचा एक काळ गाजवलेला अभिनेता बॉबी देओल सध्या 'आश्रम' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. बॉबी हा धर्मेंद्र यांचा छोटा मुलगा आणि सनी देओलचा छोटा भाऊ आहे. ५२ वर्षांच्या बॉबीने इंडस्ट्रीतील २५ वर्षांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. १९९५ मध्ये बॉबीने बरसात या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. काही काळानंतर फ्लॉप चित्रपटांमुळे बॉबीच्या करिअरला ब्रेक लागला. काही वर्षांनंतर बॉबीने सलमान खानच्या 'रेस ३' या चित्रपटातून कमबॅक केलं. मात्र आता त्याने 'आश्रम' या वेब सीरिजद्वारे दमदार पुनरागमन केलं आहे. celebritynetworth.com ने दिलेल्या माहितीनुसार, बॉबी देओल तब्बल ६० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून बॉबीची सर्वाधिक कमाई होते. बॉबीला आलिशान व महागड्या गाड्यांची आवड आहे. त्याच्याजवळ रेंज रोव्हरपासून लँड क्रूझरपर्यंत अनेक आलिशान गाड्या आहेत. मुंबईतल्या विलेपार्ले या ठिकाणी बॉबीचा आलिशान बंगलासुद्धा आहे. या बंगल्याची किंमत जवळपास सहा कोटींहून अधिक असल्याचं म्हटलं जातं. बॉबीच्या पत्नीचं नाव तान्या असून या दोघांना दोन मुलं आहेत. -
सर्व छायाचित्र सौजन्य- सोशल मीडिया

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक