बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री दिशा पटानी तिच्या अभिनयासोबतच फॅशनसेन्स आणि स्टाइलमुळेही कायम चर्चेत असते. ( सौजन्य : दिशा पटानी फॅनपेजवरुन साभार.) सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या दिशाचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी दिशा कायमच प्रयत्न करत असते. उत्तम फॅशनसेन्समुळे ओळखल्या जाणाऱ्या दिशाचा सध्या एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे दिशाचा हा लूक पाहिल्यानंतर तिला ओळखणंदेखील कठीण आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला दिशाचा फोटो एका फॅनपेजवर शेअर करण्यात आला असून हा फोटो म्हणजे दिशाचं पहिलं फोटोशूट असल्याचं सांगण्यात येत आहे. वयाच्या १७ व्या वर्षी दिशाने पहिलं फोटोशूट केलं होतं. फॅनपेजवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये दिशा अत्यंत वेगळी दिसत आहे. दिशाने साडीमध्ये तिचं पहिलं फोटोशूट केलं होतं. दिशाने 'एम.एस. धोनी' या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. 'एम.एस.धोनी'नंतर तिने 'बागी 2' या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. सलमान खानच्या 'भारत' या चित्रपटात झळकल्यानंतर दिशा लवकरच 'राधे' या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

शनीदेव निघाले तांब्याच्या पावलांनी; २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात होणार मोठ्या उलाढाली? काय होणार तुमच्या नशिबाचे?