-
२०२० हे वर्ष आता संपत आले आहे. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे अनेक चित्रपट निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेतला. चला पाहूया २०२०मध्ये प्रदर्शित झालेल्या इंटरनॅशनल वेब सीरिज…
-
द क्राऊन – नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉमवरील 'द क्राऊन' ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. या वेब सीरिजचे हे चौथे पर्व आहे. द क्राऊन ही वेब सीरिज नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झाली होती.
-
या हंगामाची खास गोष्ट ही, ब्रिटनची प्रिन्सेस डायना आणि पहिली महिला पंतप्रधान मार्गरेट थॅचर यांची भूमिका दाखवण्यात आली आहे. या दोघांच्या भूमिकेने यंदाच पर्व त्यांच्या नावावर केलं आहे.
-
या पर्वानंतर अनेक लोकांना प्रिन्सेस डायनाला सहानूभुती दाखवली आणि ब्रिटनच्या राजघराण्यावर टीका केली आहे.
-
द क्वीन्स गॅमबेट – वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉमवर प्रदर्शित झालेली वेब सीरिज 'द क्वीन्स गॅमबेट'ने मोठ्या प्रमाणात लोकांची मने जिंकली आहेत. ही वेब सीरिज बुद्धिबळ या खेळावर आधारीत आहे.
-
द क्वीन्स गॅमबेट वेब सीरिज जगात सगळ्यात जास्त पाहिल्या जाणाऱ्या वेब सीरिज पैकी एक ठरली आहे. या वेब सीरिजला ६ कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. वेब सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर बुद्धिबळ या खेळाची मागणी वाढली आहे.
-
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी देखील या सीरिजची प्रशंसा केली आणि त्यांच्या स्पेशल लिस्टमध्ये ही सीरिज असल्याच त्यांनी सांगितल आहे.
-
बेटर कॉल सॉल – ऐतिहासिक टीव्ही शो ब्रेकिंग बॅडच्या एका भूमिकेवर आधारीत 'बेटर कॉल सॉल' ही वेब सीरिज आहे.
-
ही वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉमवर प्रदर्शित करण्यात आली आहे. या वेब सीरिजच हा ५ सिझन आहे.
-
संघर्षमय आयुष्य जगणाऱ्या एका वकिलाच्या जीवनावर आधारीत ही वेब सीरिज आहे. एक वकील जो नेहमीच अपयशी ठरतो ही या वेब सीरिजची पटकथा आहे.
-
ट्रायल बाय मीडिया – अमेरिकन टेलिव्हिजनने अशा अनेक वेब सीरिज तयार केल्या ज्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहेत.
-
'ट्रायल बाय मीडिया' ही वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली आहे. या वेब सीरिजमध्ये अमेरिकेच्या इतिहासातील काही गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.
-
ज्यामध्ये न्यायालयाने कोणताही निर्णन घेण्याआधी कशा प्रकारे मीडिया द्वारे काही गोष्टी ठरवल्या किंवा बोलल्या जातात. मे २०२०मध्ये या वेब सीरिजचा ६ सिझन प्रदर्शित करण्यात आला आहे.
-
द बॉइज – अमेरिकेच्या इंडस्ट्रीमध्ये सुपर हीरोची चर्चा होणे हे नवीन राहिलेल नाही. अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'द बॉइज' ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे.
-
या वेब सीरिजची कथा ही सुपर हीरोवर आधारीत आहे. यंदाच्या वर्षी या सीरिजचा २ सिझन प्रदर्शित झाला आहे.
-
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनीही त्यांच्या स्पेशल लिस्टमध्ये या वेब सीरिजला जागा दिली आहे.

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”