प्रिन्स हॅरी आणि पत्नी मेगन मार्कल यांच्याकडे नेहमीच एक पॉवर कपल म्हणून पाहिलं जातं. पण आता अशा काही सेलिब्रिटी जोड्या चर्चेत आल्या आहेत ज्यांनी प्रिन्स हॅरी आणि मेगनला मागे टाकलं आहे. चला जाणून घेऊयात कोण आहेत हे पॉवर कपल… अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा: २०१९ मध्ये अर्जुनचे दोन चित्रपट लागोपाठ फ्लॉप ठरले होते. त्यानंतर त्याने जेव्हा मलायकासोबत असलेल्या त्याच्या रिलेशनशिपबद्दल जाहिर केलं तेव्हा पासून तो सोशल मीडियावर नेहमीच चर्चत असतो. सुट्टीच्या दिवशी मलायकासोबत राहणे किंवा तिच्या सोबत नसताना सोशल मीडियावर प्रेम व्यक्त करणे, या सगळ्या गोष्टींमुळे ही जोडी सतत चर्चेत असते. -
या दोघांच्या लग्नाकडे नेटकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
अली फजल-रिचा चड्ढा: या दोघांनी करोनाच्या प्रादुर्भावामुळे लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे. मग रिलेशनशिपमध्ये असल्यापासूनच ही जोडी चर्चेत आहे. रिचा तिच्या शकिला या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. करोनाकाळात या दोघांची जोडी सतत चर्चेत होती. दोघांनी नुकतंच नवीन घर विकत घेतलं आहे. झैद दरबार-गौहर खान: बिग बॉसच्या ७व्या पर्वाची विजेती व अभिनेत्री गौहर खान ही सध्या तिच्या लग्नामुळे फार चर्चेत आहे. संगीतकार इस्माइल दरबार यांचा मुलगा झैदशी तिचा निकाह पार पडला. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. रोहनप्रीत सिंग-नेहा कक्कर: बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले होते. -
आधी लग्नाच्या चर्चा आणि नंतर प्रेग्नंट असलेल्याची खोटी बातमी या सगळ्यामुळे ते चर्चेत आले.
-
आदित्य नारायण-श्वेता अग्रवाल: आदित्य नारायण आणि श्वेताच्या लग्नाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आदित्यचे वडील उदित नारायण हसत हसत म्हणाले की, माझ्या लग्नाकडे एवढं कोणाचं लक्ष नव्हतं जेवढ आदित्यच्या लग्नाकडे आहे.
-
आदित्य आणि श्वेता ११ वर्षांपासून सोबत असल्याने यांच्याकडे पॉवर कपल म्हणून पाहिले जाते.

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक