अभिनेत्री रसिका सुनील हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकासाठी नवीन नाही. (सौजन्य : रसिका सुनील इन्स्टाग्राम पेज) 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनाया या भूमिकेमुळे रसिका घराघरात पोहोचली आणि लोकप्रिय झाली. अभिनयासोबतच रसिकाच्या लूकची आणि तिच्या फॅशनसेन्सची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते. कलाविश्वासोबतच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेली रसिका अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. यावेळी मात्र, रसिकाने कोणताही ग्लॅमरस फोटो शेअर केला नसून चक्क बोल्ड अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. रसिकाने वर्कआऊट करतानाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पहिल्यांदाच रसिकाचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये रसिकाचा लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सध्या रसिकाच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. रसिकाने कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. रसिकाविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यामुळे रसिकादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती