TV ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय हिचं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. या फोटोशूटचे फोटो मौनीनं आपल्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये मौनीचा हॉट अॅण्ड बोल्ड लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. काळ्या रंगाचा टॉप आणि सोनेरी रंगाच्या स्कर्टवर मौनीचं सौंदर्य आधिकच खुललं आहे. आपल्या अदांनी मौनीनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. छोट्या पडद्यावरील मौनी रॉयने तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. मौनीनं सोशल मीडियावर व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. मौनीनं शेअर केलेल्या फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. हॉट आणि बोल्ड अंदाजामध्ये मौनी रॉय दिसत आहे.. यापूर्वीही बोल्ड फोटो मौनीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बोल्ड फोटोमुळे मौनी रॉय काही वेळा ट्रोलही झाली आहे. मौनीने बॉलिवूडमध्ये येण्याआधी कलर्स टीव्हीवरील ‘नागिन’ आणि ‘नागिन 2’ या शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर मौनीचा मोठा चाहतावर्ग आहे. ‘नागिन’ मालिकेतून घराघरात पोहोचणाऱ्या मौनीने अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मौनी नेहमी तिच्या लूकमुळे चर्चेत असते. सध्या मौनी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट यंदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. -
हॉट अदांच्या पडाल प्रेमात
-
पाहा मौनी रॉयचं हॉट फोटोशूट
-
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते
-
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते.
छोट्या पडद्यावरील मौनी रॉयने तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य – मौनी राय इन्स्टाग्राम)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल