मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे. ( सौजन्य : अभिज्ञा भावे इन्स्टाग्राम पेज) उत्तम अभिनयासोबतच अभिज्ञा तिच्या 'तेजाज्ञा' या कपड्यांच्या ब्रँण्डसाठीही प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिज्ञाच्या लग्नाची चर्चा रंगली होती. अखेर अभिज्ञाने मेहुल पैसोबत लग्नगाठ बांधली आहे. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला. -
या लग्नसोहळ्यातील काही फोटो अभिज्ञाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिज्ञा अत्यंत सुंदर दिसत असून तिच्या खास डिझायनर साडीची चाहत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. अभिज्ञाने पर्पल- गुलाबी रंगाची डिझायनर नऊवारी साडी नेसली होती. तर मेहुलनेदेखील तिला मॅचिंग कपडे परिधान केले होते. मेहुल मुंबईत स्थायिक असून ऑक्टोबर महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर या दोघांच्याही घरी लग्नाची गडबड सुरु झाली होती. लग्नापूर्वीचे सगळे विधी अभिज्ञाच्या घरी थाटामाटात साजरे करण्यात आले असून यातील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. -
अभिज्ञा आणि मेहुल
-
अभिज्ञाच्या सुनमुखाचा कार्यक्रम
( सौजन्य : अभिज्ञा भावे इन्स्टाग्राम पेज)

Nepal Gen Z Protest : माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळलं! नेपाळमध्ये ‘जेन-झी’ आंदोलकांचा हिंसाचार