मराठी चित्रपटसृष्टीत 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर लवकरच अभिनेत्री मिताली मयेकरशी लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाची खरी तयारी केळवणापासून सुरू होते आणि गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ-मिताली मित्र-मैत्रिणींकडे केळवणाचा आनंद घेत आहेत. नुकतंच या दोघांचं 'साऊथ स्टाइल'मध्ये केळवण पार पडलं. याचे फोटो सिद्धार्थ आणि मितालीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यावेळी सिद्धार्थ आणि मिताली दाक्षिणात्य पारंपरिक पोशाखात पाहायला मिळाले. आरती वडगबाळकर आणि आशुतोष परांडकर यांनी सिद्धार्थ-मितालीचा पाहुणाचार केला. यावेळी धुरळा या चित्रपटाचा लेखक क्षितिज पटवर्धन व त्याची पत्नीसुद्धा उपस्थित होती. काल पहिल्यांदा गोरेगाव ईस्ट मध्ये साऊथ बघायला मिळालं, असं मजेशीर कॅप्शन देत सिद्धार्थने हे फोटो पोस्ट केले आहेत. सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, सिद्धार्थ-मिताली

बापरे! महिलांनो बाजारातून कढीपत्ता घेताना सावधान! “हा” VIDEO पाहाल तर झोप उडेल; यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल