-
झी युवा वाहिनीवरच्या 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' मालिकेतील प्रमुख पात्र म्हणजे सई. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय ठरली. (सर्व फोटो सौजन्य – गौरी कुलकर्णी इन्स्टाग्राम)
-
'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' मध्ये सईची भूमिका रंगवणारी गौरी कुलकर्णी ही २०२१ या नवीन वर्षात सर्व इच्छा आकांशा पूर्ण करताना दिसतेय.
-
गौरीने नुकतीच एक नवीन गाडी घेतली आहे. तिने या नवीन गाडीचे स्वागत करतानाचे फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या नवीन गाडीचे स्वागत करताना गौरीचा आनंद गगनात मावत नव्हता. तिने गाडी सोबतचा फोटो ‘एक नवीन सदस्य’ असं कॅप्शन लिहून पोस्ट केला आहे.
-
ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेत गौरीचे सहकलाकार प्रिया मराठे, तेजस बर्वे यांनी देखील तिला अभिनंदन करून नवीन गाडीतून राईड कधी मिळणार? असं विचारलंय.
-
गौरी कुलकर्णी मूळची अहमदनगरची आहे. तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण अहमदनगरमधून झाले आहे.
-
पदवीचे पुढचे शिक्षण घेत असलेली गौरी कथ्थक नृत्य कलेत पारंगत असून कॉलेज स्पर्धांमध्ये तिला अनेक पारितोषिके मिळाली आहेत.
-
2017 साली आलेल्या 'रंजन' चित्रपटातून गौरीने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाचे कथानक गावातील प्रेम कथेवर आधारीत होते.
-
सध्या ती झी युवा वाहिनीवरील 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे.
-
परदेशातून मुंबईमध्ये आलेला नचिकेत आणि मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय घरामध्ये वाढलेली संस्कारी सई यांची साधी सरळ प्रेमकथा आहे.
-
परस्पर विरुद्ध दोन टोकांच्या वातावरणामध्ये वाढलेल्या या दोघांमध्ये तयार होणारी मैत्री, आकर्षण आणि त्यानंतरचं त्यांचं प्रेम या अनुशंगाने मालिकेची कथा उलगडताना दिसते.
-
गौरी कुलकर्णीला वाचनाची आवड आहे. मालिकेच्या सेटवर गौरी जवळ नेहमीच एखादे पुस्तक असते. चित्रीकरणातून मोकळा वेळ मिळाल्यानंतर ती वाचनात वेळ घालवते.
-
साने गुरुजींचे 'श्यामची आई', सचिन पिळगावकर यांचे 'हाच माझा मार्ग' ही तिच्या आवडीची पुस्तके आहेत.

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…