-
छोट्या पडद्यावरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका सध्या तुफान लोकप्रिय होत आहे. या मालिकेतील स्वीटू आणि ओम या जोडीने कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.
-
ओमकारची भूमिका साकारणारा अभिनेता शाल्व किंजवडेकर आज अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे.
-
मालिकेत ओमकार आणि स्वीटूच्या मैत्रीचं आता हळूहळू प्रेमात रुपांतर होत असतानाच ओमकारच्या खऱ्या आयुष्यातील स्वीटूची चर्चा सुरु आहे.
-
शाल्व किंजवडेकर रिलेशनशिपमध्ये आहे.
-
श्रेया डाफळापूरकर असे शाल्वच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे.
-
शाल्व आणि श्रेयाच्या रिलेशनशिपला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत.
-
नात्याला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शाल्वने श्रेयासोबतचा एक फोटोही इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. 'Two years of madness and love' असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले होते.
-
प्रेमसंबंध आणि खासगी आयुष्याबद्दल शाल्व जाहीरपणे बोलत नाही. पण श्रेया सोबतचे सोशल मीडियावरील त्याचे रोमँटिक फोटोज त्याच्या प्रेमसंबंधाबद्दल सर्व काही सांगून जातात.
-
श्रेया ही स्टायलिस्ट असून तिचं स्वतःच फॅशन लेबलसुद्धा आहे.
-
शाल्व किंजवडेकरने हंटर, मेड इन हेवन आणि वन्स अ इअर या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
(सर्व छायाचित्र – शाल्व किंजवडेकर/इन्स्टाग्राम)

अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा! थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा, जोडीदाराचं नाव आहे खूपच खास…