-
आज महाशिवरात्री या दिवशी महादेवाचे सगळे भक्त हे त्यांच्या भक्तीत लीन असल्याचे दिसते. महादेवचे चमत्कार या बद्दल जाणून घेण्याची इच्छा प्रत्येक भक्ताला असते. महादेवाचा महिमा घराघरात पोहचावा यासाठी छोट्या पडद्यावर मालिकांच्या माध्यामातून महादेव प्रकटले. आज महाशिवरात्रीच्या निमित्तान आपण अशा अभिनेत्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या रुपाने प्रेक्षकांना महादेवाचं दर्शन घडलं. या कलाकारांना महादेवाची भूमिका साकारल्याने खरी ओळख मिळाली आणि लोकप्रियतेचं शिखर गाठता आलं
-
जय मल्हार – 'जय मल्हार' या मालिकेत महादेवाचा अवतार म्हणजेच खंडोबा दाखवण्यात आला आहे. मात्र, मालिकेच्या सुरूवातील महादेव त्यांच्याच रूपात पृथ्वीतलावर आले आणि त्यांनी खंडोबाचे रूप घेतले. या मालिकेत अभिनेता देवदत्त नागे याने महादेवाची आणि खंडोबाची भूमिका साकारली आहे.
-
देवो के देव महादेव- 'देवो के देव महादेव' या मालिकेत अभिनेता मोहित रैना यांने महादेवाची भूमिका साकारली होती. अनेकांनी तर मोहित हा महादेवाच्या भूमिकेतच उत्तम दिसतो किंवा तो महादेवाची सावली असल्याचे म्हटले आहे.
-
शिव महिमा – ९०च्या दशकातली ही मालिका आहे. रामानंद सागर यांच्या रामायन या मालिकेत रामाची भूमिका साकारणाऱ्या अरूण गोविल यांनी शिव महिमा या मालिकेत महादेवाची भूमिका साकारली होती.
-
श्री गणेशा – ही मालिका अनेकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. म्हणूनच लॉकडाऊनमध्ये चाहत्यांच्या आग्रहानंतर ही मालिका पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आली होती. या मालिकेत महादेवाची भूमिका ही अभिनेता सुनील शर्माने साकारली होती.
-
संकटमोचन महाबली हनुमान – ही मालिका हनुमानच्या आयुष्यावर आधारीत आहे. पण, हनुमान हा महादेवाचा अंश असल्याने या मालिकेत महादेवाची भूमिका खूप महत्त्वाची होती. या मालिकेत अमित मेहराना महादेवाची भूमिका साकारली होती.
-
नीली छत्री वाले – 'नीली छत्री वाले' या मालिकेत अभिनेता हिमांशु सोनीने शिवाची भूमिका साकारली होती.
-
ओम नम: शिवाय – मोहित रैना नंतर महादेवाच्या भूमिकेत सगळ्यात जास्त लोकप्रियता अभिनेता समर जय सिंग याला मिळाली होती.
-
जय जय शिवशंकर- या मालिकेत अभिनेता संतोष शुक्लाने महादेवाची भूमिका साकारली होती.
-
सिया के राम- 'सिया के राम' ही मालिका प्रभु रामचंद्र यांच्या आयुष्यावर होती. मात्र, शिवा विना रामायन पुर्ण होत नाही. या मालिकेत अभिनेता रोहित बख्शीने महादेवाची भूमिका साकारली होती.
-
ओम नम: शिवाय – दूरदर्शनवर ९०च्या दशकात 'ओम नम: शिवाय' ही मालिका सुरू झाली होती. अभिनेता यशोवर्धन राणाने महादेवाची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे यशोवर्धन घराघरात पोहोचला होता.
-
देवा श्री गणेशा – स्टार प्रवाहवरील 'देवा श्री गणेशा' या लोकप्रिय मालिकेत अभिनेता पंकज विष्णू महादेवाची भूमिका साकारत आहे.

Air India Plane Crash: “एअर इंडियाचे विमान पायलटने जाणूनबुजून क्रॅश केले असावे”, भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक तज्ज्ञाचा दावा