-
बॉलिवूड अभिनेता हरमन बावेजा विवाहबंधनात अडकला आहे. (All Photos: Instagram)
-
हरमन बावेजाने हेल्थ एक्स्पर्ट साशा रामचंदानीसोबत लग्न केलं आहे.
-
रविवारी पंजाबी पद्धतीने दोघांचा विवाहसोहळा पार पडला.
-
डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता.
-
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्रामला लग्नाचे फोटो शेअर केले असून हरमनला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हरमन बावेजाचा खास मित्र आहे.
-
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राने हरमनसाठी एका चित्रपटाची निर्मितीदेखील केली होती.
-
शिल्पा शेट्टी काही कारणास्तव लग्नासाठी उपस्थित राहू शकली नाही.
-
मात्र राज कुंद्राने मित्राच्या लग्नात एन्जॉय करताना कोणतीही कसर सोडली नाही.
-
शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्रामला राज कुंद्राचे डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत.
-
अभिनेते आमीर अली आणि आशिष चौधरीदेखील लग्नाला हजर होते.
-
अभिनेत्री सागरिका घाटगेनेही लग्नाला हजेरी लावली असून अनेक फोटो शेअर केले आहेत.
-
सागरिकाने इन्स्ट्राग्रामला शेअर केलेला फोटो
-
लग्नाला सागरिका एकटीच आली होती. यावेळी पती झहीर खान सोबत नव्हता.
-
हरमन बावेजा हा निर्माते हॅरी बावेजा यांचा मुलगा आहे.
-
हरमनने २००८ मध्ये 'लव्ह स्टोरी २०५०' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये त्याच्यासोबत प्रियांका चोप्रा होती.
-
यानंतर 'व्हिक्टरी' आणि 'व्हॉट्स युअर राशी' या चित्रपटांमध्येही हरमन झळकला होता. पण त्याचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.
प्रियांकासोबतच्या अफेअरमुळेही हरमन चर्चेत होता.

India On Trump : ‘अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत…’, ट्रम्प यांनी २५ टक्के अतिरिक्त कर लादल्यानंतर भारताचं सडेतोड उत्तर