-
‘माझा होशील ना’ या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे. (सर्व फोटो सौजन्य : गौतमी देशपांडे /इन्स्टाग्राम)
-
उत्तम अभिनय कौशल्य आणि गोजिरवाणा चेहरा यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गौतमी देशपांडे विशेष लोकप्रिय आहे.
-
नुकताच गौतमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये गौतमीचा नऊवारी साडीतील लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय.
-
'झी मराठी अवॉर्ड' या सोहळ्यासाठी गौतमीने खास लूक केला होता. नऊवारी साडी, त्यावर पारंपरिक दागिने, नथ, आणि फेटा असा गौतमीचा मराठमोळा साज प्रेमात पाडणारा आहे.
-
गौतमीने शेअर केलेल्या फोटोला तिने 'गं साजनी.. कुन्या गावाची कुन्या नावाची… कुन्या राजाची तु गं रानी गं…' असं कॅप्शन दिलं आहे. गौतमीच्या या फोटोशूटला तिच्या चाहत्यांनीही चांगलीच पसंती दर्शवली आहे.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली