-
बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींचं नाव जेव्हा घेतलं जात तेव्हा माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर आहे. माधुरी दीक्षित हे नाव घेतलं की डोळ्यासमोर तिच्या सुपरहिट चित्रपटांची यादी येते.
-
आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित.
-
बॉलिवूडची ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी आणि सुंदर हास्यासाठी ओळखली जाते. नृत्यात तर तिला कोणीच मात देऊ शकत नाही.
-
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी माधुरी कायम सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.
-
अभिनेत्री माधुरी दीक्षित सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कुटुंबीयांसोबत मालदीव येथे गेली आहे.
-
मालदीव हे स्वच्छ, निर्मळ आणि मन मोहून टाकणाऱ्या सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे.
-
मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर काढलेले ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
कधी बीचवर तर कधी समुद्रात जाऊन माधुरीने खास फोटो शूट केलं आहे.
-
या सुंदर फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी या फोटोंवर कौतुकाचा वर्षावर केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने / इनस्टाग्राम)

Indian Student : “व्हिसाचा गैरवापर सहन केला जाणार नाही”, हातकड्या घातलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेने काय म्हटलं?