-
अप्रतिम बेली डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकणारी नोरा फतेही मोरक्कन-कॅनेडियन अभिनेत्री आहे. (सर्व फोटो सौजन्य : नोरा फतेही / इन्स्टाग्राम)
-
‘दिलबर’ या रिक्रिएटेड गाण्याने युट्यूबवर धुमाकूळच घातला आणि या गाण्यामुळे नोरा फतेही प्रकाशझोतात आली.
-
२०१४ मध्ये नोरानं ‘रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
त्यानंतर ‘क्रेझी कुक्कड फॅमिली’ या चित्रपटातही ती झळकली. मात्र हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटले.
-
त्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटांमधील आयटम साँग्समुळे ती प्रकाशझोतात आली. ‘टेम्पर’, ‘बाहुबली’, ‘किक २’ यांसारख्या चित्रपटांतील नोराचे आयटम साँग्स विशेष गाजले.
-
अप्रतिम बेली डान्स कौशल्यामुळे नोराने अत्यंत कमी वेळात आपली ओळख प्रस्थापित केली.
-
नोरा सोशल मीडियावरील मादक फोटोंमुळेही चर्चेत असते. नोराच्या डान्स आणि स्टाइलचे लाखो चाहते आहेत. तिचे इन्स्टाग्रामवर जवळपास २६.५ मिलियन फॉलोअर्स आहेत.
-
अप्रतिम बेली डान्ससाठी ओळखली जाणारी नोरा आता बॉलिवूडमध्ये आयटम साँगसोबतच अभिनयसुद्धा करू लागली आहे.
-
नोराने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
नोराने केलेलं फोटोशूट सध्या प्रचंड चर्चेत आहे. नोराच्या या खास फोटोशूटला सोशल मीडियावर चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट, १७ वर्षांच्या संसारानंतर पत्नीपासून विभक्त