-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कॉमेडी शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो.’ या शोमध्ये काम करणारी अभिनेत्री सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांचे लग्न झाले आहे.
-
काही दिवसांपूर्वी सुगंधाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.
-
पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने 'तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. २६.०४.२०२१' असे म्हटले होते.
-
त्यामुळे सोमवारी २६ एप्रिल रोजी ते दोघे लग्न बंधनात अडकले असल्याचे समोर आले आहे.
-
सध्या सोशल मीडियावर त्यांच्या मेहंदीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
-
त्यांचा लग्नसोहळा जालंधर येथील कबाना क्लबमध्ये पार पडला आहे.
-
करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांनी काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित लग्न केले आहे.
-
काही दिवसांपूर्वी सुगंधाने सोशल मीडिया पोस्टद्वारे साखपूडा झाल्याचे सांगितले होते.
-
फोटो शेअर करत तिने अंगठीचा इमोजी वापरला असून फोटो संकेतला टॅग केला होता.
-
२०१६ पासून सुगंधा आणि संकेत एकमेकांना डेट करत होते.
-
त्यावेळी त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या.
-
पण त्यांनी कधीही त्यांच्या नात्यावर उघडपणे वक्तव्य केले नव्हते.
-
(All Photos: sugandhamishra23 instagram)

Raja Gosavi : “पितळी भांडी विकून गुजराण, ब्रेड आणि आमटी…” राजा गोसावींच्या मुलीने उलगडली सुपरस्टारची हलाखी