-
भूषणने नुकताच ‘सर्वांत आकर्षक पुरुष’चा किताब जिंकला आहे.
-
अभिनयाप्रमाणेच भूषण त्यांचा लूककडेही विशेष लक्ष देत असतो. इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचे बरेच स्टायलिश फोटो पाहायला मिळतात.
-
आपली उंची आणि आकारमान यानुसार आपण घातलेले कपडे व्यवस्थित बसायला हवेत, असं वाटू लागल्याने भूषणने पहिल्यांदा जिमला जाण्यास सुरुवात केली.
-
शाळेपासूनच त्याला सायकलिंग, स्विमिंगची आवड होती. त्याचा फायदा झालाच, पण जिमला जाऊ लागल्यानंतर खऱ्या अर्थाने फिटनेसकडे लक्ष वेधलं गेलं, असं तो म्हणतो.
-
जिममध्ये रोजचा व्यायाम करताना त्यात लेग एक्सरसाईझला जास्त प्राधान्य देत असल्याचे तो सांगतो. त्यात स्कॉट्स, लंजेस, डेडलिफ्टससारखे प्रकार असतात. कारण त्यातूनदेखील पूर्ण शरीराचा व्यायाम होतो.
-
फंक्शनल ट्रेनिंग करत असताना टायर पाठीवर घेऊन पुश अप्स करणं, दोरीच्या उड्या मारणं, या अशा वेगळ्या गोष्टीही आपल्या फिटनेसमध्ये अंतर्भूत केल्या असल्याचं त्याने सांगितलं.
-
सहा महिन्यांत बॉडी बनवणं, हा अतिशय विचित्र प्रकार आजकाल अनेक जण करताना दिसतात, पण अशापद्धतीने शरीरावर काम केलं तर त्याचा जितका लवकर रिझल्ट शरीरावर दिसतो, तितक्याच लवकर त्याचे वाईट परिणामही दिसू लागतात. त्यामुळे संयम ठेवून प्रयत्न करत राहणं अतिशय महत्त्वाचं असल्याचं भूषण म्हणतो.
-
अनेक जण सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी लवकर रिझल्ट मिळणाऱ्या गोष्टी करतात, पण त्याने शरीराला, मनाला होणारा त्रासही त्या व्यक्तींनी लक्षात घ्यायला हवा, असं तो आवर्जून म्हणतो. कारण आपल्या वयासोबत आपली क्षमता, आपलं शरीर, आपलं मन सबळ होत असते. त्यामुळे योग्य पद्धतीने, आवश्यक तेवढे श्रम घेऊन संयमाने फिटनेससाठी प्रयत्न करणंच योग्य असल्याचं त्याने सांगितलं.
-
अभिनयाच्या जोरावर भूषण प्रधानने आज मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चं नाणं खणखणीत वाजवलं आहे.
-
भूषणने मराठी चित्रपट, वेब सीरिज व नाटकांमध्ये काम केलंय.
-
‘आम्ही दोघी’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘सतरंगी रे’, ‘मिस मॅच’, ‘टाइमपास’, ‘टाइमपास २’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलंय. (सर्व छायाचित्र सौजन्य : भूषण प्रधान / इन्स्टाग्राम)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग