-
लग्न म्हणजे जन्मभराचे ऋणानुबंध… प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
-
७ मे रोजी दुबईत सोनालीचा विवाह सोहळा पार पडला.
-
सोनालीने तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
-
सोनालीने कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली.
-
दुबईतील एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला.
-
'दोन दिवसांत सगळं ठरवलं. एका तासात खरेदी आणि १५ मिनिटांमध्ये चार लोकांच्या साक्षीने मंदिरात (इथे कोव्हिड निर्बंधांमुळे तेवढंच शक्य आहे) वरमाळा, मंगळसूत्र, कुंकू केवळ या ३ गोष्टी करून (लग्नाच्या मान्यतेसाठी मंदिराकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विधी) मॅरेज सर्टिफिकेटवर स्वाक्षरी केली' अशी पोस्ट सोनालीने लग्नचे फोटो शेअर करताना लिहिली.
-
सोनालीच्या परिवाराने या सोहळ्याला ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावल्याचंही तिने शेअर केलेल्या फोटोंमधून दिसत आहे.
-
सोनालीवर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
सोनाली आणि कुणालच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दुबईतच सोनाली आणि कुणालचा साखरपुडा पार पडला होता. (सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी / इन्स्टाग्राम)

HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत