-
झी मराठी वाहिनीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अमृता धोंगडे.
-
मालिकेतला सुमीचा अंदाज रसिकांना चांगलाच पसंत पडला होता.
-
या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी अमृताचे सुमी हे पात्र आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे.
-
सोनी मराठी वाहिनीवरील 'चांदणे शिंपीत जाशी' या मालिकेत अमृताने चारूची भूमिका साकारली.
-
अमृता सध्या तिच्या खासगी जीवनामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामागचं कारण अमृताने सोशल मीडियावर पोस्ट केलेला फोटो.
-
'चांदणे शिंपीत जाशी' या मालिकेतील अभिनेता अतुल आगलावेच्या वाढदिवसानिमित्त अमृताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता.
-
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशी मोठी पोस्ट लिहून 'आय लव्ह यू, नेहमी माझ्यासोबत राहा' असं म्हणत अमृताने अतुलसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.
-
अतुलने त्या फोटोवर 'आय लव्ह यू सो मच' अशी कमेंट केली आहे. अतुलने केलेल्या कमेंटमुळे डेटिंगबद्दलच्या चर्चांना उधाण आल्याचं दिसत आहे.
-
खरंच हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांसमोर आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता धोंगडे / इन्स्टाग्राम)

ना मॉम, ना मम्मी…; परदेशात राहूनही जपले मराठी संस्कार! माधुरी दीक्षितची मुलं तिला ‘या’ नावाने मारतात हाक, पाहा फोटो