-
छोट्या पडद्यावरील काही मालिका या अत्यंत कमी वेळात लोकप्रिय होतात. त्यातलीच एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस’.
-
अभिनेता किरण गायकवाड याची मुख्य भूमिका असलेली ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
-
एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही मालिका झी मराठीवर आली, आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.
-
सध्या या मालिकेत डिंपल आणि अजितच्या लग्नाची लगबग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
‘देवमाणूस’ ही मालिका आता एका निर्णायक आणि रंजक टप्प्यावर आली आहे.
-
इकडे दिव्या अजितच्या विरोधात पुरावे गोळा करतेय.
-
सरू आज्जी देखील हे लग्न होऊ देणार नाही यावर ठाम आहे.
-
आता जशी या लग्नाची उत्सुकता आहे, तशीच देवीसिंगला अटक कधी होणार? याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागलेय. तसंच डॉक्टरसोबत डिंपललासुद्धा पोलीस ताब्यात घेणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

ना मॉम, ना मम्मी…; परदेशात राहूनही जपले मराठी संस्कार! माधुरी दीक्षितची मुलं तिला ‘या’ नावाने मारतात हाक, पाहा फोटो