-
‘पुढचं पाऊल’, ‘सरस्वती’, 'बिग बॉस मराठी' यांसारख्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी.
-
सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत सहज व्यक्त होण्यासाठी सर्रास वापरलं जाणारं माध्यम म्हणजे सोशल मीडिया.
-
अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
जुईने नुकतंच ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
सोशल मीडियामुळे सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यातील दरी कमी झाली आहे. मात्र त्याचसोबत ट्रोलिंगचंही प्रमाण खूप वाढलं आहे.
-
जुईने केलेलं ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटोशूट मात्र नेटकऱ्यांना रुचलं नाही.
-
'सोशल मीडियावर जर तुला स्थिरस्थावर व्हायचे असेल तर वादविवाद करणे आवश्यक आहे. अलका कुबल बनून राहशील तर तुझ्याकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही. बघ प्रयत्न करून. मला अलकाजींवर टीका करायची नाही, पण इतका ताणलेला नम्र, सोज्वळ स्वभाव इकडे चालत नाही. या प्लॅटफॉर्मवर कसं सगळं हॉट पाहिजे असतं' अशी कमेंट युजरने केली आहे.
-
'तुम्ही दिलेल्या सल्ल्याबद्दल धन्यवाद. पण मला हॉटनेसमध्ये रस नाही आणि ज्यांना मी आवडते ते माझ्याकडे नक्की बघतील. असो तुम्हाला शुभेच्छा.' ट्रोल करणाऱ्यांना जुईने सडेतोड उत्तर दिलं आहे.
-
या ट्रोलिंगवर अभिनेत्री जुई गडकरीने संताप व्यक्त केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी / फेसबुक)

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”