-
झी मराठीवरच्या 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला सोहम उर्फ बबड्या म्हणजेच अभिनेता आशुतोष पत्की
-
आशुतोष पत्कीने या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
-
अभिनयाप्रमाणेच आशुतोष त्यांचा लूककडेही विशेष लक्ष देत असतो.
-
आशुतोषने नुकतंच हेअर कट केल्याचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. 'जेव्हा स्वत:चेच केस कापण्याचा प्रयत्न फसतो तेव्हा' असं कॅप्शन देत आशुतोषने हा फोटो शेअर केला आहे.
-
साध्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. अनेक चाहत्यांना आशुतोषचा हा लूक प्रचंड आवडला आहे. (सर्व फोटो सौजन्य : आशुतोष पत्की / इन्स्टाग्राम)

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”