-
सध्या बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांची सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा सुरुय. अनेक चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटांमध्ये अभिनेत्री तापसी पन्नूच्या 'हसीन दिलरुबा'चाही समावेश आहे. (सर्व फोटो नेटफ्लिक्सवरुन साभार)
-
'हसीन दिलरुबा' हा लव्ह ट्रँगल पद्धतीचे कथानक असणारा चित्रपट असल्याच ट्रेलरवरुन स्पष्ट होतं आहे.
-
तापसीसोबत अभिनेता विक्रांत मैसी आणि हर्षवर्धन राणे चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.
-
चित्रपटामध्ये विक्रांत आणि तापसी हे विवाहित जोडपं दाखवण्यात आलं आहे.
-
या लव्ह स्टोरीमध्ये हर्षवर्धन तिसरा व्यक्ती म्हणून एन्ट्री करतो असं साधारण कथानक असल्याचा अंदाज बांधला जातोय.
-
'हसीन दिलरुबा' हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर, थ्रिलर लव्ह स्टोरी प्रकारातील आहे.
-
'हसीन दिलरुबा'च्या पोस्टरची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा या चित्रपटाच्या टिझरचीही सुरु आहे. या चर्चेमागील मुख्य कारण आहे तापसीने दिलेले बोल्ड सीन्स.
-
'हसीन दिलरुबा'च्या टीझरमध्येच तापसीने अनेक बोल्ड सीन्स दिल्याचं दिसून येत आहे.
-
तापसी मागील काही काळापासून तिच्या वेगळ्या कथानक असणाऱ्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 'रश्मि रॉकेट', 'लूट लपेटा'नंतर आता ती 'हसीन दिलरुबा'मुळे चर्चेत आहे.
-
तापसीने यापूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरच्या माध्यमातून तिने चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे यासंदर्भातील माहिती दिली होती.
-
नुकताच तापसीने 'हसीन दिलरुबा'चा टीझर शेअर केला. आपल्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन टीझर शेअर करताना तापसीने 'प्यार के तीन रंग, खून के छींटों के संग', अशी कॅप्शन दिली आहे.
-
या टीझरवरुन तापसी, विक्रांत आणि हर्षवर्धन यांच्यावर आधारित अनेक बोल्ड सीन्स या चित्रपटामध्ये असतील असा अंदाज व्यक्त केला जातोय.
-
चित्रपटाचे संपूर्ण कथानक हे प्रेम, रहस्य आणि त्यामधून होणारी फसवणूक याबद्दल असल्याचा प्राथमिक अंदाज चाहते बांधताना दिसत आहेत.
-
टीझरमधून हर्षवर्धनची भूमिकाही तापसी आणि विक्रांतइतकीच महत्वाची असल्याचं दिसून येत आहे.
-
हा चित्रपट दोन जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट, १७ वर्षांच्या संसारानंतर पत्नीपासून विभक्त