-
महाराष्ट्राची लाडकी गायिका आर्या आंबेकरचा आज वाढदिवस आहे.
-
झी मराठी वाहिनीवरील 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आर्या आंबेकर हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकाला नवीन नाही.
-
गोड आवाजाबरोबरच आर्याच्या सौंदर्यानेदेखील अनेकांना भूरळ घातली आहे.
-
गायनक्षेत्राप्रमाणेच आर्याने अभिनय क्षेत्रातदेखील तिचं नशीब आजमावलं आहे.
-
आर्याचा जन्म नागपूरमध्ये समीर आणि श्रुती आंबेकर या मराठी दांपत्याच्या घरी झाला.
-
आर्याचे वडील समीर आंबेकर हे डॉक्टर असून आई श्रुती आंबेकर गायिका आहे. आर्याने आपल्या आईकडून गायनाचे धडे घेतले.
-
आर्या साडेपाच वर्षाची असताना तिने आपल्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी तिने संगीताची पहिली परीक्षा दिली.
-
आर्याची आजीसुद्धा एक शास्त्रीय गायिका आहे. तिने आर्या जेमतेम २ वर्षाची असतानाच तिचे गायनातले कौशल्य ओळखले.
-
झी मराठीवर २००८ मध्ये रंगलेल्या 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या रिअॅलिटी शोने आर्या आंबेकरला खरी ओळख मिळवून दिली.
-
आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी भाषा अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायली आहेत.
-
२०१७ च्या सुरवातीस प्रदर्शित झालेल्या 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून तिने अभिनय कारकीर्दीस सुरुवात केली.
-
माणिक वर्मा शिष्यवृत्ती, डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार, मोस्ट नॅचरल परफॉरमन्स ऑफ द इअर, सूर ज्योत्सना राष्ट्रीय संगीत अशा अनेक मानाच्या पुरस्काराने आर्याला सन्मानित करण्यात आले आहे.
-
उत्तम आवाजा आणि अभिनय यांच्या जोरावर आज ती लोकप्रिय सेलिब्रिटी आहे.
-
दरम्यान, आर्याचा आज अफाट मोठा चाहतावर्ग तयार झाला असून तिच्याविषयी प्रत्येक अपडेट्स जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात.
-
आर्यादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
(सर्व फोटो सौजन्य : आर्या आंबेकर / इन्स्टाग्राम)

दिवाळीआधीच ‘या’ ३ राशी होतील कोट्यधीश! शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशांची वाढ तर करिअर धरणार सुस्साट वेग