-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा’मध्ये काम करणारी अभिनेत्री म्हणजे सुमोन चक्रवर्ती.
-
या शोच्या माध्यमातून सुमोनने अनेकांच्या मनात घर केले आहे.
-
आज २४ जून रोजी सुमोनचा वाढदिवस. त्या निमित्त जाणून घेऊया तिच्या विषयी काही खास गोष्टी.
-
सुमोनचे आज लाखो चाहते आहेत.
-
सुमोनने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
‘बडे अच्छे लगते है’, ‘जमाई राजा’, ‘कस्तुरी’, ‘कसम से’ यांसारख्या मालिकांमध्ये ती दिसली होती.
-
तिने ‘किक’, ‘बर्फी’ आणि ‘फिर से’ यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.
-
पण लॉकडाउनच्या काळात कपिल शर्मा शोचे चित्रीकरण बंद असल्यामुळे सुमोनवर आर्थिक संकट कोसळले होते.
-
सुमोनने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली होती.
-
'मी सध्या बेरोजगार असले तरी माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे पोट भरु शकते. कधी कधी माझ्या मनात अपराधीपणाची भावना येते. खास करुन जेव्हा मी स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मी यापूर्वी याबाबत सांगितले नव्हते' असे सुमन म्हणाली होती.
-
पुढे ती म्हणाली, 'मी २०११ पासून एंडोमेट्रिओसिस या आजाराशी लढत आहे. या आजाराच्या चौथ्या स्टेजचा मी सामना करत आहे. चांगले जेवणे, व्यायाम आणि ताणवमुक्त आयुष्य यावरचा उपाय आहे.'
-
सुमोन सोशल मीडियावर सतत तिचे फोटो देखील शेअर करत असते.
-
तिचे फोटो कायम चर्चेचा विषय ठरतात.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली