-
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तापसी पन्नू चर्चेत आहे.
-
या चर्चा तिचा आगामी चित्रपट ‘हसीन दिलरुबा’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सुरु झाल्या होत्या.
-
'हसीन दिलरुबा' हा चित्रपट २ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटात तापसीने अभिनेता विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन राणे यांच्यासोबत इंटिमेट सीन दिले आहेत.
-
आता एका मुलाखतीमध्ये तापसी आणि हर्षवर्धनने इंटिमेट सीन देतानाचा अनुभव सांगितला आहे.
-
हर्षवर्धनने नुकताच 'नेटवर्क १८'ला मुलाखत दिला आहे.
-
या मुलाखतीमध्ये तापसीसोबत इंटिमेट सीन देण्याबाबत हर्षवर्धन राणे म्हणाला, 'तापसी ही एक उत्तम अभिनेत्री आहे. या चित्रपटात अनेक बोल्ड आणि इंटिमेट सीन्स आहेत. तापसीसोबत इंटिमेट सीन करताना माझ्या मनात थोडी धाकधूक होती. पण तापसी आपल्या कामाबाबत अतिशय गंभीर असून तिने माझी भीती घालवली आणि सहजपणे काम करण्यास मदत केली.'
-
दरम्यान तापसीने देखील विक्रांत आणि हर्षवर्धनसोबत इंटिमेट सीन देतानाचा अनुभव सांगितला आहे.
-
'मला असे वाटले होते की दोघेही माझ्यासोबत इंटिमेट सीन देताना थोडे घाबरले होते. माझी प्रतिमा किंवा इतर कोणत्या गोष्टींमुळे मी हा सीन कसा शूट करणार असे त्यांना वाटत होते.. कारण मी सतत दिग्दर्शकाकडे जाऊन प्रत्येक गोष्टीची तक्रार करत असे' असे तापसी म्हणाली.
-
‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटात तापसी, विक्रांत आणि हर्षवर्धन यांचा लव्ह ट्रँगल दाखवण्यात आला आहेत.
-
हा चित्रपट एक मिस्ट्री थ्रिलर आहे.
-
येत्या २ जुलै रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन विनील मॅथ्यू यांनी केले आहे.
-
आनंद एल राय आणि हिमांशु शर्मा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना बुलेटप्रूफ वाहनही नाकारले, ६ महिने साध्या इनोव्हातून प्रवास; राजीनाम्याआधी काय घडलं?