-
अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा आज वाढदिवस आहे.
-
रियाचा जन्म १ जुलै १९९२ साली बंगळूरुमध्ये झाला.
-
रिया २००९मध्ये एमटीव्ही वरील 'टीवीएस स्कूटी तीन दीवा'मध्ये सहभागी झाली होती.
-
रिया 'मेरे डॅड की मारुती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
रियाने 'सोनली केबल' चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.
-
रियाने 'जलेबी' या चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेच्या त्यावेळी विशेष चर्चा रंगल्या होत्या.
-
रियाने अभिनेता रितेश देशमुखसोबत 'बँक चोर' या चित्रपटात काम केले आहे.
-
रिया चक्रवर्तीच्या संपत्तीचा आकडा पाहून तुम्ही थक्क व्हाल.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार रिया चक्रवर्तीचं नेटवर्थ जवळपास ११ कोटी आहे.
-
रिया एका चित्रपटासाठी ३० लाख रुपये मानधन घेते.
-
रियाची एका महिन्याची कमाई ही २.५ लाख इतकी आहे.
-
रियाने खार आणि नवी मुंबई येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये दोन फ्लॅट घेतले आहेत.
-
यातील खारमधील घर जवळपास ८५ लाख रुपयांचं असून त्यासाठी रियाने २५ लाखांचं डाऊनपेमेंट केलं होतं. तर ६० लाखांचं गृहकर्ज घेतलं होतं. हा फ्लॅट ५५० स्क्वेअर फिटचा आहे. तर दुसरा फ्लॅट २०१२ मध्ये घेतला होता आणि २०१६ मध्ये या घराचा ताबा मिळाला होता. या फ्लॅटची किंमत ६० लाख रुपये आहे.
-
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुख्य संशयित आरोपी म्हणून अभिनेत्री रिया चक्रवर्तीकडे पाहिलं जात आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर कलाविश्वातील ड्रग्स प्रकरण समोर आलं होतं. यात रिया आणि तिच्या भावाचं नाव उघड झालं होतं.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिया चक्रवर्ती / इन्स्टाग्राम)

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला