-
'हिरकणी' चित्रपटानंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणखी एका ऐतिहासिक भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा मोठ्या कौशल्यानं सांभाळत मुघलांशी दोन हात करणाऱ्या छत्रपती ताराराणींच्या शौर्याची गाथा सांगणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'छत्रपती ताराराणी' असं या चित्रपटाचे नाव असून सोनाली कुलकर्णी या चित्रपटात छत्रपती ताराराणींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.
-
लोकेश गुप्ते दिग्दर्शित 'डेट भेट' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनाली कुलकर्णी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
मराठी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय चेहरे एकाच वेळी 'झिम्मा' या चित्रपटातून झळकणार आहेत. यात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे.
-
'फ्रेश लाईम सोडा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी / इन्स्टाग्राम)

कुटुंबीयांचा विरोध ते १६ वर्षांचा सुखाचा संसार; गिरीश ओक व पल्लवी ओक यांची प्रेमकहाणी आहे खूप खास, म्हणाले…