-
मंदिरा बेदी – राज कौशल : बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी आणि तिच्या कुटुंबावर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंदिराचा पती आणि चित्रपट निर्माता राज कौशलचे ३० जून २०२१ रोजी निधन झाले.
-
१९९९ साली मंदिराने दिग्दर्शक आणि निर्माता असलेल्या राज कौशलशी लग्न गाठ बांधली होती. मंदिरा आणि राज यांना वीर नावाचा एक मुलगा आहे. तर राज कौशलने २०२० साली एका मुलीला दत्तक घेतले असून तिचे नाव त्यांनी तारा असे ठेवले आहे.
-
शांतीप्रिया – सिद्धार्थ : दक्षिणेतून बॉलिवूडमध्ये आलेल्या अभिनेत्री शांतीप्रियानेही अगदी लहान वयातच पती गमावला. १९९९ साली शांतीप्रियाने अभिनेता सिद्धार्थ रेशी लग्न गाठ बांधली होती. २००४ साली सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
-
विजयेता पंडित – आदेश श्रीवास्तव : अभिनेत्री विजयेता पंडितने ११९० साली संगीतकार आदेश श्रीवास्तव यांच्याशी लग्न गाठ बांधली होती. २०१५ साली कर्करोगामुळे श्रीवास्तव यांचे निधन झाले.
-
लीना चंदावरकर – किशोर कुमार : ८०च्या दशकात अत्यंत निरागस आणि गोंडस दिसणारी लीना चंदावरकरने लग्नाच्या काही दिवसांतच तिचा नवरा सिद्धार्थ बंडोरकर यांना गमावले. सिद्धार्थ गोव्याच्या राजकीय कुटुंबातील असून त्यांचे एका रस्ते अपघातात निधन झाले. त्यावेळी लीना चंदावरकर केवळ २५ वर्षांची होती. नंतर लीनाने किशोर कुमार यांच्याशी लग्न केले. लीना चंदावरकर किशोरजींची चौथी पत्नी होती. किशोर कुमार लीनापेक्षा वीस वर्ष मोठे होते, पण किशोर कुमार यांचेही १९८७ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आणि वयाच्या ३७व्या वर्षी, लीनाने पुन्हा आपला जीवनसाथी गमावला.
-
कहकशां पटेल – आरिफ पटेल : अभिनेत्री आणि मॉडेल कहकशां पटेल बॉलिवूडचा तसेच पंजाबी म्युझिक अल्बमचा नामांकित चेहरा आहे. 'कामबख्त इश्क' चित्रपटाच्या 'ओम मंगलम' या गाण्यात काम करणार्या कहकशां पटेल पटेल यांनी बिझनेसमन आरिफ पटेलशी लग्न केले. २०१८ साली हृदयविकाराच्या झटक्याने आरिफ पटेलचे निधन झाले.
-
रेखा – मुकेश अग्रवाल : सौंदर्य आणि कला यांचा अनोखा संगम म्हणजे रेखा! सौंदर्य, अभिनय आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी मजल मारली. रेखा यांनी उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न गाठ बांधली होती. लग्नानंतर सातच महिन्यांत मुकेश अग्रवालने आत्महत्या केली होती.
-
मीनाकुमारी – कमाल अमरोही : आरस्पानी सौंदर्यामुळे बॉलिवूडमध्ये राज्य करणाऱ्या दिवंगत अभिनेत्री मीनाकुमारी यांच्या आठवणी आजही जीवंत आहे. त्यांच नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर त्यांनी उत्कृष्ट अभिनय केलेल्या चित्रपटांची यादी समोर येतं. १९५२ साली मीनाकुमारींची प्रमुख भूमिका असलेला ‘बैजूबावरा’ हा चित्रपट गाजला अन् त्या प्रसिद्ध झाल्या. त्याच वर्षी त्यांनी कमाल अमरोही या त्यांच्याहून वयाने १५ वर्षांनी मोठा असलेल्या शायर दिग्दर्शकाशी लग्न केलं. मात्र त्यांचा हा संसार फार काळ टीकू शकला नाही. त्यांनी १९६४ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विभक्त राहत असलेल्या मीनाकुमारी यांचं ३१ मार्च १९७२ रोजी लिव्हर सोरायसिसने निधन झालं.
-
गीता दत्त – गुरु दत्त : पार्श्वगायक गीता दत्त यांनी दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक आणि निर्माते गुरु दत्त यांच्याशी १९५३ साली लग्न गाठ बांधली होती. १९६४ साली गुरु दत्त यांनी जगाचा निरोप घेतला. काही वर्षानंतर गीता दत्त यांचेही निधन झाले.
-
सुतापा सिंकदर – इरफान खान : आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खानचे २९ एप्रिल २०२० रोजी निधन झाले.
-
लक्ष्मीकांत बेर्डे – प्रिया बेर्डे : मराठी सिनेरसिकांचा गळ्यातील ताईत लक्ष्या म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत यांनी १६ डिसेंबर २००४ ला जगाचा निरोप घेतला.

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”