-
सध्या 'पवित्र रिश्ता २.०' ही मालिका चर्चेत आहे.
-
ही मालिका 'पवित्र रिश्ता' या मालिकेचे दुसरे पर्व आहे. पण या मालिकेत कोणते कोणते कलाकार दिसणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
-
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मानव ही भूमिका अभिनेता शाहीर शेख साकारणार आहे.
-
अभिनेत्री अंकिता लोखंडे अर्चना या भूमिकेत दिसणार आहे.
-
आता या मालिकेत मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे देखील दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.
-
पण अभिज्ञा कोणती भूमिका साकारणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
-
अभिनेत्री उषा नाडकर्णी देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत.
-
त्यानंतर अभिनेता रणदीप राय मानवच्या भावाची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे.
-
तसेच रणदीपच्या गर्लफ्रेंडची भूमिका अभिनेत्री अशीमा वर्धन साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
२००९मध्ये पवित्र रिश्ता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
-
या मालिकेत मानव ही भूमिका दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने साकारली होती.
-
आता पवित्र रिश्ता २.०साठी चाहते उत्सुक आहेत.

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक